रयत  फाऊंडेशन चे खराडी मध्ये उदघाटन ... 

    रयत एक सामाजिक बांधिलकी या उद्देशाने खराडी येथील तरुणांनी एकत्र येऊन रयत फौंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना  खराडी येथे केली . संस्थेचे उदघाटन मा. कैलास पठारे  व बापू वसंत पठारे   यांच्या हस्ते करण्यात आले . 
          या कार्यक्रमाचे औचित्य साधून रयत फौंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात  आले  होते . शिबिराचे उदघाटन प्रभाग क्र. ०४ चे नगर सेवक महेंद्र पठारे  यांच्या हस्ते करण्यात आले .संस्थेचे कार्याध्यक्ष अमोल अवचिते,अध्यक्ष  निलेश फसले ,उपाध्यक्ष गणेश यादव, सचिव गोकुळ गवळी , सागर कांबळे ,रोहित कांबळे ,सुहास कांबळे ,प्रकाश लोंढे ,अविनाश पांढरे ,या संस्थेच्या पदाधिकारी  व सदस्य यांनी मिळून कार्क्रमाचे आयोजन केले . 
        कार्यक्रमास प्रमुख उपस्थित नगरसेवक मा.  भैयासाहेब जाधव ,नगरसेविका संजीला पठारे ,नगर सेविका सुमन पठारे , डॉ  भाऊसाहेब जाधव ,डॉ दीपक कांबळे ,बाळासाहेब पठारे ,रमेश पठारे ,पोलीस उपनिरीक्षक  संदीप साळुंखे ,स्वप्नील  कानिफनाथ पठारे ,स्वप्नील रमेश पठारे इ .मान्यवर उपस्थित होते . 
        कार्यक्रमाचे प्रस्थाविक रयत चे अध्यक्ष्य निलेश फसले ,यांनी केले  तर  सूत्रसंचालन सागर कांबळे ,आभार गणेश यादव यांनी मानले.  

Comments